बीड (वृत्तसंस्था) धारावती तांडा परिसरात वीटभट्टीवर काम करणाऱ्या आई सोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. नात्यातील (relationship) निर्दयी सख्या मामानंच हे दुष्कृत्य केलं आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत (POSCO Act) गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मात्र कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही महिला आपल्या भावाकडे राहते. या महिलेला पतीनं सोडून दिलं आहे. ही महिला वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर नात्यातील सख्या निर्दयी मामानेच असह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत गलिच्छ दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
नराधम मामा केवळ अल्पवयीन भाचीवर अत्याचार करून थांबला नाही तर तो अत्याचारास विरोध करणार्या आपल्या बहिणीला ही मारहाण करत होता. या प्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात गुरनं ९९/२०२२ कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन), ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादवी, कलम ३, ४,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.