भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुस्लिम कॉलनी बाहेर मजीत समोर एक इसमाच्या राहत्या घरी गच्चीवरती तलवार असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यावरून सदर इसमाच्या राहत्या घरी तपासणी केली असता तीन तलवारी आढळून आल्या असून पोलिसांनी तलवारी जप्त केल्या आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, फिर्यादी पोकॉ जावेद हकीम शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी बाहेर मजीत समोर गुलाम गौस कालू शहा (रा. मुस्लिम कॉलनी) याच्या राहत्या घरी (प्राणघातक शास्त्र) तलवार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यावरून त्यांनी दालनात स.फौ शिरीफोद्दीन काझी, पोकॉ सचिन पोळ, अक्षय चव्हाण योगेश माळी अशांना बोलावून दि. ३० मार्च २०२२ रोजी सकाळी ०६.३५ वाजेच्या सुमारास गुलाम गौस कालू शहा यांचे राहत्या घरी गेले. त्याने दरवाजा उघडला त्यावेळी त्यास तेथे येण्याचे प्रयोजन सांगीतले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या घराच्या गच्चीवरती लोखंडी तलवार असल्याचे सांगितले. त्यावरून त्याच्या घराच्या गच्चीवर पोलीस कर्मचाऱ्यांना जाऊन पाहणी केली असता तीन तलवारी मिळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन २०८/२०२२ भा.द वि कलम ४/२५ प्रमाणे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोना महेश चौधरी करीत आहे.