लखनऊ (वृत्तसंस्था) एका विवाहित तरुणानं आपल्या बायको आणि मित्राच्या मदतीनं प्रेयसीची निर्घृण हत्या (Girlfriend’s brutal murder) केल्याची घटना उघडकीस आहे. आधी प्रेयसीचा गळा आवळला त्यानंतर शीर धडावेगळं (Slit head with knife) करत मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सुहागिनी रामवीर सिंह असं हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचं नाव असून ती उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याच्या वैदपुरा परिसरातील खरदूली गावातील रहिवासी होती. तर या प्रकरणी पोलिसांनी मोहन, त्याची पत्नी आणि मित्र यांना अटक केली आहे. आरोपी मोहन हा जेसीबी चालक असून तो विवाहित आहे. २०१९ साली त्याचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांनी तो वैदपुरा परिसरातील खरदूली गावात कामानिमित्त जायचा. त्यामुळे अनेकदा कामाच्या ठिकाणीच तो मुक्काम करायचा.
तिघांनी रचला हत्येचा कट
दरम्यान त्याची ओळख २१ वर्षीय तरुणी सुहागिनीशी झाला. यानंतर दोघांत प्रेमसंबंध जुळले. दोघांचे प्रेमसंबंध काही दिवस सुरळीत चालल्यानंतर सुहागिनीनं मोहनकडे लग्नासाठी तगादा लावला. तसेच लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार करेल अशी धमकी सुहागिनीनं दिली. यामुळे आरोपी मोहन अस्वस्थ झाला होता. यानंतर त्यानं सर्व प्रकार आपल्या पत्नीला आणि मित्राला सांगितला आणि तिघांनी मिळून सुहागिनीच्या हत्येचा कट रचला.
असं उलगडलं हत्येचं गूढ
७ फेब्रुवारी रोजी मोहननं सुहागिनीला फूस लावून बादपुरा भागातील यमुना नदीवरील रेल्वे पुलावर घेऊन गेला. तिथे आधीपासून मोहनची पत्नी आणि त्याचा मित्र राहुल उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सुहागिनीचा स्कार्फनं गळा आवळून खून केला. यानंतर तिघांनीही चाकूनं तिचा गळा कापून शीर धडावेगळं केलं. यानंतर आरोपीनं मृत तरुणीचं शीर आणि धड यमुना नदीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी कसून तपास करत हत्येचं गूढ उलगडलं आहे. तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.