TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक्सक्ल्युझिव्ह : अटलांटा, गोलाणी मार्केट, घरकुलनंतर आता वॉटरग्रेस ; अॅड. पाटलांनी मागवली महासभेची संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वॉटरग्रेस व महापालिकेत स्वतंत्र लवाद नेमण्यात आला तर महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी दिली तर संबंधित नगरसेवकांविरोधात तक्रार केली जाईल, असा इशारा अ‌ॅड. विजय पाटील यांनी दिला होता. परंतू देखील महासभेत बहुमताने ‘लवाद’ नेमण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दि. १२ मे रोजी झालेल्या महासभेच्या संपूर्ण कामकाजाची माहिती व ऑनलाईन झालेल्या महासभेचे संपूर्ण रेकॉर्डींगची, नगरसेवकांचे मतदान, अजेंडा व आयुक्तांचे अभिप्राय बाबतची माहिती अॅड. पाटील यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे महानगरपालिकेकडून मागवली आहे. दरम्यान, अटलांटा, गोलाणी मार्केट, घरकुलनंतर आता वॉटरग्रेस विरोधात कायदेशीर पावलं उचलायला सुरुवात झाल्यामुळे पालिकेच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

वॉटरग्रेस व महापालिकेत स्वतंत्र लवाद नेमण्यात आला तर महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. लवाद नेमून केवळ संबंधित ठेकेदाराला फायदा होणार असून, महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे, महासभेपुढे प्रशासनाने दिलेल्या ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करण्याची गरज आहे. नगरसेवकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर संबंधित नगरसेवकांविरोधात तक्रार केली जाईल, असा इशारा अ‌ॅड. विजय पाटील यांनी दिला. घरकुल प्रकरणात देखील लवादाने आरोपींच्या बाजूने एकतर्फी निर्णय घेतला होता. त्यामुळे, अनेक नगरसेवकांना शिक्षा देखील भोगावी लागत आहे. घरकुल प्रकरणापासून नगरसेवकांनी बोध घेऊन वॉटरग्रेसच्या लवाद नेमण्याच्या प्रक्रियेबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला देखील अ‌ॅड. विजय पाटील यांनी दिला होता. परंतू तरी देखील लवाद नेमण्यात आला आहे. त्यामुळे विजय पाटील यांनी माहिती अधिकारात महानगपालिकेच्या दि. १२ मे रोजी झालेल्या महासभेच्या संपूर्ण कामकाजाची माहिती व ऑनलाईन झालेल्या महासभेचे संपूर्ण रेकॉर्डींगची, नगरसेवकांचे मतदान, अजेंडा व आयुक्तांचे अभिप्रायसह इतर माहिती मागवली आहे.

 

अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी मागितलेली माहिती खालील प्रमाणे आहे.

 

१) दिनांक १२ मे रोजी झालेल्या जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांच्या महासभेचा संपूर्ण अजेंडा व संपूर्ण डॉकेट यांची आयत्या वेळेच्या विषयांसह सत्यप्रती आपल्या सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून मिळाव्यात.
२) दि. १२ मे रोजी झालेल्या महासभेतील विषय क्रमांक २ जळगाव शहर महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणेबाबत “प्रशासनाकडून दिलेल्या प्रस्तावाची व डॉकेटची तसेच सदर विषय चर्चेच्या वेळी ऑनलाईन उपस्थित असलेल्या संपूर्ण नगरसेवकांच्या नावांच्या यादीची सत्य व प्रमाणित प्रत, तसेच सदरील याच्या वेळी झालेली विस्तृत संपूर्ण चर्चेचा तपशिल रेकॉर्डींग, इतिवृत्ताची सही शिक्याची प्रमाणित सत्यप्रत तसेच सदरील विषयास उपस्थित असणाऱ्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीबाबत घेण्यात आलेल्या स्वाक्षरी रजिष्टरची सही शिक्क्याची प्रमाणित सत्यप्रत.

 

उपायुक्त तसेच सदरील महासभेतील विषय क्रमांक २ या संदर्भात आयुक्त यांच्या सही शिक्क्याची प्रमाणित सत्यप्रत. तसेच सदरील महासभेतील विषय क्रमांक २ या विषयाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांच्या नावानिशी सही शिकक्याची यादी व ठरावाच्या बाजूने मतदान केलेल्या प्रक्रियेचे रेकॉर्डींगची प्रमाणित सत्यप्रत. ठरावाच्या विरोधात अथवा तटस्थ असलेल्या नगरसेवकांची नावानिशी सही शिकक्याची यादी व ऑनलाईन मतदान घेतलेल्या संपूर्ण प्रक्रियेचे रेकॉर्डींगची प्रमाणित सत्यप्रत.

 

दिनांक १८/०५/२०२१ सदरील विषयास उपस्थित असणाऱ्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीबाबत घेण्यात आलेल्या स्वाक्षरी रजिष्टरची सही शिक्क्याची प्रमाणित सत्यप्रत. तसेच सदरील विषय क्रमांक २ संबंधीत झालेल्या चर्चेच्या इतिवृत्ताची सही शिकक्याची प्रमाणित सत्यप्रत. तसेच सदरील विषय क्रमांक मंजूर झालेल्या ठरावाची सही-शिक्क्यानिशी प्रमाणित सत्यप्रत.

 

३) दिनांक १२/०५/२०२१ रोजी झालेल्या महासभेतील विषय शहर महानगरपालिका व मकेदार वॉटर पेरा पॉडक्ट नाशिक यांच्यात असलेल्या वादाबाबत Arbitra tion & Conciliation Act-19 च्या तरतुदीप्रमाणे abitrator & Conciliator (लवाद मध्यस्थ नेमनेबाबत) निर्णय घेणेसाठी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावादी प्रमाणित प्रत. तसेच सदरील महासभेतील विषय क्रमांक ९ या संदर्भात आयुक्त यांचा अभिप्रायाची प्रमाणित सत्यप्रत.

 

तसेच सदरील महासभेतील विषय क्रमांक-१ या विषयाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांच्या नावानिशी सही शिकक्याची यादी व ठरावाच्या बाजूने ऑनलाईन मतदान केल्याचे संपूर्ण रेकॉर्डींगची प्रमाणित सत्यप्रत. ठरावाच्या विरोधात अथवा तटस्थ असलेल्या नगरसेवकांची नावानिशी सही-शिक्क्या ची यादी व ऑनलाईन मतदान घेतलेल्या संपूर्ण प्रकियेची रेकॉर्डींगची प्रमाणित सत्यप्रत.

 

तसेच सदरील विषयास उपस्थित असणाऱ्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या स्वाक्षरी रजिष्टरची सही शिक्क्याची प्रमाणित सत्यप्रत. तसेच सदरील विषय क्रमांक ९ च्या संबंधीत झालेल्या चर्चेच्या इतिवृत्ताची सही शिक्क्याची प्रमाणित सत्यप्रत. तसेच सदरील विषय क्रमांक-९ बाबत मंजूर झालेल्या ठरावाची सही शिक्क्याची प्रमाणित सत्यप्रत.

 

४) दिनांक १२/०५/२०२१ रोजी झालेल्या महासभेच्या सुरुवातीपासून ते महासभासंभेपर्यंत झालेल्या ऑनलाईन प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉडींगची प्रमाणित सत्यप्रत.

 

५) दिनांक १२/०५/२०२१ रोजी झालेल्या महासभेच्या विषय क्रमांक २ व विषय क्रमांक ९ यात झालेल्या संपूर्ण कामकाजाची दाखल झालेल्या कागदपत्रांची, संपूर्ण माहितीची सही-शिक्याचीनिशी प्रमाणित सत्यप्रत.

 

अटलांटा, गोलाणी ब्रदर्स, घरकुल आणि आता वॉटरग्रेस !

 

शहराच्या दैनंदिन सफाईसाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांचा देखील सहभाग आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अ‌ॅड. विजय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केला होता. येणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेमध्ये दुवा म्हणून लवाद नेमण्याचे षड्यंत्र बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवरच्या सांगण्यावरूनच रचले जात असल्याचा आरोपही ‌अ‌ॅड. पाटील यांनी केला होता. दरम्यान, यापूर्वी देखील अटलांटा आणि पालिका, गोलाणी ब्रदर्स विरुद्ध पालिका,घरकुल प्रकरण व पालिका अशा मुद्यांवरून महापालिकेतील राजकीय नेते कायदेशीर अडचणीत सापडलेले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

बनावट टूलकिटप्रकरणात संबित पात्र व रमणसिंहविरोधात गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षेच्या स्थगिती याचिकेबाबत देवकर म्हणतात….

September 30, 2020

जळगाव : लग्नाला जाण्यापूर्वी घरात फ्रिजरमध्ये लपवलेले साडेतीन लाखांचे दागिने चोरी !

January 11, 2024

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये

October 29, 2020

राज्य बँक असोसिएशनवर गुलाबराव देवकर यांची बिनविरोध निवड !

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group