जळगाव (प्रतिनिधी) रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य खरेदीसाठी शासनाने यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत निश्चित केली होती. मात्र, BeAM पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे जिल्हास्तरावर अनेक शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रिया प्रलंबित होती.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक ७ जुलै २०२५ रोजी संदर्भीय शासन निर्णयान्वये (पत्र क्र. 1125/प्र.क्र.19/नापु29) धान व भरडधान्य खरेदीसाठीची अंतिम मुदत २० जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे.
राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय राज्य मंत्री खासदार श्रीमती रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय वामनराव सावकारे, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार यांच्या विशेष प्रयत्नातून ही मुदतवाढ मिळविण्यात आली आहे.
“या मुदतवाढीच्या मागणीसंदर्भात राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी बांधवांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. खरेदी केंद्रावर आपली धान व भरडधान्य विक्री प्रक्रिया पूर्ण करून आधारभूत किंमतीचा लाभ मिळवावा.” असे आवाहन त्यांनी पणन महासंघाच्या वतीने पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम केले आहे.
जळगाव जिल्ह्यात १८ केंद्रे कार्यरत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 25-26 मधील ज्वारी, मका, बाजरी (भरडधान्य) खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यात खालील १८ खरेदी केंद्रे कार्यरत आहेत: अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगाव, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना पुढील कागदपत्रे सादर करावीत:आधारकार्ड, बँक पासबुक , ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा ८अ उतारा खरेदी केंद्रावर LIVE PHOTO देऊन नोंदणी पूर्ण करावी.