जळगाव (प्रतिनिधी) पंढरपूर येथील खंडणी, खुनाचा प्रयत्न व मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यांमधील अट्टल गुन्हेगाराला जळगाव एलसीबीने जळगावातील गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी अट्टल गुन्हेगाराला पुंढरपूर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पवन अनिल अधटराव वय-२६ पुडलिक जुन्या कोर्टाशेजारी, पंढरपूर असे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि मोक्का मधील गुन्हेगाराला पवन अधटराव हा जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी सोमवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहूल पाटील., जितेंद्र पाटील, भारत पाटील यांच्यासह पथकाने कारवाई करत गुन्हेगाराला पवन अधटराव याला अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्यावर खूनाचा गुन्हा, खंडणी आणि मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील कारवाईसाठी गुन्हेगाराला पंढरपूर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.