TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

दीड लाख रुपये एका वधूची किंमत, दोन पुरुषांसह पाच महिलांना घेतले ताब्यात !

vijay waghmare by vijay waghmare
April 20, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) फर्दापूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पळासखेडा (ता. सोयगाव) येथे बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोन पुरुषांसह पाच महिलांना ताब्यात घेतले तर एक जण ५५ हजार रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे. लग्नाचं वय झालेल्या तरुणांच्या घरच्यांना दलालामार्फत लग्न लावून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत होती. साधारणतः एका वधूची किंमत दीड लाख रुपये असायची, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बनावट टोळीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. १८) पळासखेडा येथील दोन तरुणांचे लग्न होणार होते. त्यातील एकाचे धनवट शिवारातील वाघूर नदीकाठी असलेल्या चौंडेश्वर महादेव मंदिरात लागले व दुसऱ्याचे लग्न पळासखेडा येथेच होणार होते. याबाबत नाशिकहून लग्नासाठी आलेल्या वराचा भाऊ पुरुषोत्तम नरोटे याला वधूवर संशय आला व त्याने याबाबतीत तिच्याकडे आधार कार्डची मागणी केली असता हे त्याला संशयास्पद वाटले. त्याने वधूला गावाशेजारील वाकोद (ता. जामनेर) येथे नेऊन आधारकार्डबाबतीत शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने हा घडलेला प्रकार फर्दापूर पोलिसांना कळविला त्यांनी तत्काळ या टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाइल, बनावट आधारकार्ड व इतर साहित्य हस्तगत केले. तपासणीअंती या टोळीने या अगोदर अनेक लोकांचे बनावट लग्न लावून फसवणूक केलेली असल्याचे निदर्शनास आले.

READ ALSO

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

या प्रकरणातील आरोपी सीताराम महिपाल सोनवणे (रा. पहूर, ता. जामनेर), रोशनी अशोक पवार (रा. नाशिक, खरे नाव पुनिता शंकर कामटे, रा. बिहार), सुमन प्रकाश जाधव (रा. नाशिक, खरे नाव पूजा अनिल वाल्मीकी, रा. हडपसर पुणे), रंजना कैलास आलीस (रा. इंद्रकुंड पंचवटी नाशिक), मीरा अनिल डांगे, अनिल सुखदेव डांगे (दोघे रा. लोणी खुर्द ता. वैजापूर) रेणुका कमलाकर वस्त (रा. टिटवाळा, कल्याण) यांच्याविरुद्ध संजय बाळाराम साकळे (रा. पळासखेडा) यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नीलेश लोखंडे, मकसूद तडवी, योगेश कोळी, कल्पना चाथे, कविता चाथे करीत आहे.

नातेवाईकांच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक मुलाला हेरायचे
एखाद्या नातेवाईकांच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक मुलाला हेरायचे. त्यांच्याकडून दीड ते दोन लाख रुपये हुंडा घेऊन लग्न करायचे. नंतर चार-पाच दिवस त्यांच्या घरी राहून, अंगावरील दागिन्यांसह तेथून पळ काढायचा व कटात सामील असलेल्या प्रत्येकाला वाटा द्यायचा. पुन्हा नवीन मुलाचा शोध घ्यायचा, अशी या टोळीच्या गुन्ह्याची पद्धत होती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

अदिशक्ती श्री सप्तश्रृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव वाहनाची धडक; तरुण गंभीर जखमी !

September 28, 2025

राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, ते अजित दादांनी केलं : अमोल कोल्हे

March 6, 2022

ब्राऊन शुगर प्रकरण ; मुख्य सूत्रधाराला एलसीबीने केली अटक !

December 19, 2021

राज कुंद्रा प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

July 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group