मुंबई (वृत्तसंस्था) जर तुम्ही आपल्यासाठी पेन्शन योजना (Pension Scheme) घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लॅन घेऊन आला आहे. ही पॉलिसी घेताना तुम्हाला केवळ एकाच वेळी प्रीमिअम भरावा लागणार आहे. तसंच यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहिल. या योजनेचं नाव सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana) असं आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना एक सिंगल प्रीमिअम प्लॅन आहे. जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.
LIC च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा १२००० रुपये पेन्शन मिळू शकते. तुम्हाला हे पेन्शनचे पैसे आयुष्यभर मिळतील. LIC सरल पेन्शन योजनेचे दोन प्रकार आहेत. खरेदी किंमतीच्या १००% परताव्यासह जीवन वार्षिकी ही पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे, म्हणजेच ही पेन्शन योजना एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
पेन्शन योजना संयुक्त जीवन
संयुक्त जीवनासाठी पेन्शन योजना दिली जाते. यामध्ये पती-पत्नी दोघांना पेन्शन मिळ यामध्ये जो जोडीदार जास्त काळ जगतो, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील तेव्हा नॉमिनीला मूळ किंमत मिळेल.
सरल पेन्शन योजनेची खास वैशिष्ट्ये
१) विमाधारकासाठी, त्याने पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरु होईल.
२) आता तुम्हाला पेन्शन दर महिन्याला हवी की त्रैमासिक, सहामाही की वार्षिक हवी हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा पर्याय तुम्हाला स्वतः निवडावा लागेल.
३) ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही घेता येते.
४) या योजनेत किमान १२००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
५) ही योजना ४० ते ८० वयोगटातील लोकांसाठी आहे.
६) या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.