धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. माध्यमिक च्या मुख्याध्यापक तथा उपकेंद्रसंचालक नाजनिन शेख यांनी आपल्या प्रास्तविकपर मनोगतात परीक्षेची नियमावली व बारकावे सांगितले. तसेच विद्यार्थांनी दहावीच्या परीक्षेच्या व पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. दहावीच्या परीक्षा कशा होतात याबाबत मार्गदर्शन करून सर्व माहिती कशी भरावी याबाबत अमोल सोनार यांनी आपल्या अनुभवाचे बोल सांगितले.
विद्यार्थांपैकी निलय केदार, भुवन बयस, साहिल खान, शाहीद खाटीक, मानस अग्निहोत्री, प्रीती पाटील, भूमिका सोनवणे, सानिया पाटील, भाग्यश्री पाटील, मोहिनी पांडे आदी विद्यार्थांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, दामिनी पगारिया, सागर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्या चैताली रावतोळे यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाला प्राचार्या चैताली रावतोळे, व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, दामिनी पगारिया, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड यांच्यासह इयत्ता १० वी चे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थांनी समोसा व जिलेबीचा नाश्ता देण्यात आला.