धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद शिवारातील ६ बिगे गट नं ८४/१ शेतातील अवजारे, ईलेक्ट्रीक मोटर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जगन्नाथ दगडू पाटील (वय ५८, रा.रोटवद ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ८ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ ते दिनांक ९ मे २०२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान रोटवद शिवारातील शेत गट क्रमांक ८४/१ मधील पत्री शेडाचे कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करुन ४१ हजार ५०० रुपये किंमतीचे शेतीचे अवजारे, सामान व ईलेक्ट्रीक मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत.