पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगांव शिवारीतील शेत गट नं. १७२/१ मधिल शेतातील सूर्यफूल, हरभरा या पिकांचे जाळुन नुकसान केल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात दिलीप सखाराम मोरे (वय ६०, रा. आडगांव ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६मार्च २०२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या पुर्वी आडगांव शिवारीतील शेत गट नं. १७२/१ मधील शेतातील सुर्यफुलाचे कापलेले फुल व डॉलर नावाचे हरभरा दाने असलेले पीक उन्हात वाळविण्यासाठी जमिनीवर पसरवून टाकलेले होते. कोणातरी अज्ञात इसमाने हेतुपुरस्कर शेत मालाचे नुकसान व्हावे. या द्वेषबुध्दीने आग लावून २ लाख २४ हजार रुपयांचे सूर्यफूल, हरभरा पिकांचे जाळुन नुकसान केले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास नापोकॉ प्रदिप पाटील करीत आहेत.