चोपडा (प्रतिनिधी) महिंद्रा बँकेतून लोन काढून देतो म्हणत एका शेतकऱ्याची १ लाख ९ हजार रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात किरण सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मधुसूदन हिरालाल बेलदार (वय ३१, रा. दोंदवाडे ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण सोनवणे (रा. गौतम नगर ता. चोपडा) याने मी कोटक महिंद्रा बँकेतून तुम्हाला होमलोन काढून देतो, त्याकरिता तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल फोन माझ्याकडे द्या. असे म्हणत किरण सोनवणे याने मधुसूदन यांच्या मोबाईल मधून पैसे व अकाउंट मधून १ लाख ९ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात किरण सोनवणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. देविदास नगर हे करीत आहेत.