धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात गेल्या जवळपास चार पाच दिवसातून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे पिकांची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली असून यंदाच्या खरीप हंगामाचा शेतकरी वर्गाला खुप मोठा फटका बसलेला आहे.
शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले असतानाही खासदार, आमदार यांचे जिल्हात व तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे गुरांवर आलेल्या लम्पी सारख्या गंभीर आजाराने कहर केलाय. एकीकडे शेतकरी हवालदिल झालेला असून आमदार,खासदार यांनी राजकीय टीका टिप्पणीमध्ये लक्ष न घालता आपलं काम प्रत्यक्ष कृती मधून दाखवण्याची गरज आहे .आमदार, खासदार हे शेतकरी वर्गाकडे न पाहता आपली राजकीय स्थिती बळकट करण्यासाठी गुंतलेले आहेत. प्रशासनाला विनंती आहे की, पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना आदेश देऊन शासनाकडून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी अजिंक्य क्रांती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष संदिप जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.