निलंगा (वृत्तसंस्था) आज (सोमवार) सकाळी औसा ते निलंगा रस्त्यावर झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार झाले. तर तिघे जखमी आहेत.
निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे परिवारासह पुणे येथून निलंग्याकडे येत होते. सकाळी ७ वाजेच्या सुमारास कार अचानक रस्त्याच्या खाली उतरून पलटली. त्यात सचिन यांची दोन मुले, एक पुतण्या व एक मेव्हणा जागीच ठार झाले. तर सचिन बडूरकर, त्यांची पत्नी व मुलगी जखमी असून त्यांना लातूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.