शिर्डी (वृत्तसंस्था) हज यात्रेसाठी छोटा भाऊ व भावजयीला मुंबई विमानतळावर सोडून समृद्धी महामार्गानि शिर्डीला परतताना अनियंत्रित इनोव्हा कार दुभाजकालगतच्या संरक्षक भिंतीला धडकून झालेल्या भीषण अपघातात मोठा भाऊ, बहिण, मेव्हणा व आणखी एक नातेवाइक असे चौथे ठार झाल्याची घटना रविवारी (दि ११) रात्री बाराच्या सुमारास घडली.
या अपघातात रज्जाक अहमद शेख, (५५), सत्तार शेख लाल शेख, (६५), सुलताना सत्तार शेख, (५०, सर्व रा. शिर्डी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर फैयाज दगूभाई शेख (४०, रा. शिर्डी) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (३५), मैरुनिसा रज्जाक शेख (४५), अझर बालन शेख, (२५), मुस्कान अजर शेख (२२) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात मयत रज्जाकभाई शेख हे शिर्डीच्या जामा मशिदीचे ट्रस्टी होते. त्यांचा छोटा भाऊ बालम (५२) व भावजयी शबाना (४५) हज यात्रेसाठी जाणार असल्याने त्यांना मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी दोन वाहनांमधून नातेवाइक गेले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास ही दोन्ही वाहने एकामागून एक मुंबईहून शिर्डीकडे परतत होती. रविवारी रात्री बाराच्या सुमारास खंबाळे शिवारात ५५५.८ किमी येथे घोटीकडून शिर्डीकडे अतिवेगात असलेल्या इनोव्हा कारवरील (एमएच १९, वाय ६०७४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. वेगात असलेली कार संरक्षक भिंतीवर आदळल्याने तिचा चुराडा झाला. अपघातानंतर दरवाजे लॉक झाल्याने मदतकार्य करणाऱ्यांना मयत आणि जखमींना कारच्या बाहेर काढणे कठीण झाल्याने दरवाजा कटरने कापून मृतदेह व जखमींना बाहेर काढले.
या अपघातात रज्जाक अहमद शेख (५५), बहिण सत्तार शेखलाल शेख (६५), मेव्हणा सुलताना सत्तार शेख (५०, सर्व रा. शिर्डी) हे जागीच ठार झाले. तर चालक फैयाज दगूभाई शेख (४०, रा. काकडी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (३५), मेहरुन्निसा रज्जाक शेख (४५), अझर बालन शेख (२५) मुस्कान अजहर शेख (२२) हे गंभीर जखमी झाले.