खांडबारा (प्रतिनिधी) नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर कारच्या झालेल्या भीषण अपघात यात्रेला जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील नदिरखेडा येथील गणेश सुरेश वळवी (वय २५) हा तरुण सोमवारी पहाटे नवापूर तालुक्यातील कंजरजाळी गावाची यात्र पाहण्यासाठी कारने (एमएच १९, जे ०३९५) जात होता. चार वाजेच्या सुमारास त्याच्या कारला खांडवारा जवळ घोगळ फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात त्याचा मृत्यू झाला तर अपघात इतका भीषण होता की धडापासून एक हातही वेगळा झाला होता. तसेच कारही चक्काचूर झाली.या वेळी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात कुटुंबासह नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला.