अमळनेर (प्रतिनिधी) टिकीट का काढले नाही?, याची विचारणा केलेल्या रागातून महिला बस कंडक्टरला अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी तालूक्यातील मारवड पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि.१७ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महिला बस कंडक्टर आपल्या कर्तव्यावर होत्या. यावेळी राजेंद्र भगवान पाटील (रा.निम, ता. अमळनेर) हे निम येथून बसमध्ये बसले. परंतू त्यांनी कळमसरे गावापर्यंत टिकीट काढले नाही. त्यामुळे महिला बस कंडक्टरने याबाबत राजेंद्र पाटील यांना जाब विचारला. याचा राग आल्याने त्यांनी महिला बस कंडक्टरला अश्लिल शिवीगाळ करुन करत असलेल्या शासकीय कामात अटकाव निर्माण केला. तसेच नोकरी खाण्याची धमकी दिली. याप्रकरणी मारवड पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. सुनिल तेली हे करीत आहेत.