चोपडा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकारात राजकारण करू नये, या उद्देशाने माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नऊ संचालकांना सोबत घेऊन विकासाची गंगा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणली. तसेच चोपडा तालुका राजकारणासाठी जास्त सुपीक जमीन म्हणून ओळखली जाते. टीका करणारे चोपडा तालुका नव्हे तर विकासाला साथ देऊ शकते. चोपडा तालुक्यात मागे काय झाले हे विसरून नव्या संचालक मंडळांनी काम करावे. टीका करणे हे आपले काम नव्हे, आणि आता तर सर्वे सत्तेत आहेत. त्यामुळे टीका कोणावर करणार हा गंभीर प्रश्न आहे.
आगामी निवडणुकीत कोणीच कोणावर टीका करणार नाही. कारण की सर्वांनी सत्ता भोगलेली आहे. आता तर पक्ष पेक्षाही व्यक्तीला महत्त्व दिले जात आहे. व्यक्ती विकास काम करत असेल तर पक्ष कोणताही असो तो निवडून येणारच आणि पुढाऱ्यांपेक्षा मतदार राजा हुशार होऊन गेलेला आहे. त्यांनी निश्चित केलेले आहे कोणाला आमदार बनवायचे आहे. आमचे सरकार तीन पक्षाचे असून तिघांचे वेगवेगळे विचार असले तरी शेतकरी हितासाठी तिघही पक्षांचे एक मत होत असते. शेतकरी हा विकासाच्या केंद्रबिंदू आहे. दर दोन-तीन महिन्यात कोणती ना कोणती योजना शेतकऱ्यांसाठी हे सरकार आणत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किती संवेदनशील सरकार आहे हे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात शेततळ्यांचं योजना घेण्याचे सर्वात अधिक काम ऊत्तर महाराष्ट्रात मनमाडचा पट्टा आहे. आणि सर्वात जास्त ठिबकावर अवलंबून असणारा जळगाव जिल्हा आहे. यामुळे आपल्याकडे शेततळे कमी होताना दिसत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी निवास स्थानाचे आज उद्घाटन झाले ही शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त असून कृषी उत्पन्न बाजार समितीने जर जेसीबी घेता आलं तर केळी शेत रस्ते मोकळे करावे ही शेतकऱ्यांच्या मोठा प्रश्न मिटणार आहे. शिव भोजनसाठी मी कटिबद्ध आहे. तसेच पणनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणतेही विकास काम करायचे असतील. तर मी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही नामदार गुलाबराव पाटील यांनी चोपडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य याडात ई-नाम योजनेअंतर्गत धान्यचाळणी यंत्र, प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एक हजार टनी गोडाऊन, व शेतकरी निवास, अशा विविध कामांचे उद्घाटन आज रोजी गुलाबराव पाटील आमदार लताताई सोनवणे कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक रोहित निकम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक चव्हाण, संचालक घनश्याम पाटील , नंदकिशोर पाटील, विजय पाटील, डॉ अनिल पाटील, सोनाली पाटील ,मिलिंद पाटील, कल्पना पाटील नंदकिशोर धनगर, मनोज सनेर, गोपाल पाटील, रावसाहेब पाटील ,किरण देवराज, एडवोकेट शिवराज पाटील, सुनील अग्रवाल, सुनील जैन, नितीन पाटील, उपसचिव जितेंद्र देशमुख, सचिव रोहिदास सोनवणे, हे उपस्थित होते. प्रस्ताविक नरेंद्र पाटील यांनी यांनी केले.
यापुढेही शेतकऱ्यांसाठी शिवभोजनची व्यवस्था, संपूर्ण मार्केटमध्ये काँक्रिटीकरण हमाल मापाडींसाठी निवास व्यवस्था करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधक आमची बदनामी करत असतात. परंतु विकास कामा आणून आम्ही त्यांचे तोंड बंद केलेले आहे. तेच विकास काम त्यांना सहन होत नाही. आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून अजून विविध विकास कामा आणण्याचे आमचे मानस आहे. यासाठी शेतकरी हमाल मापाडी व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आव्हानही नरेंद्र पाटील यांनी केले आहे. शेतकरी हिताची कृषी उत्पन्न बाजार समिती होते तर शॉपिंग सेंटरमध्ये दोन दारू दुकानांसाठी का देण्यात आले? असा सवालही विरोधकांना नरेंद्र पाटील यांनी केला. शेतकरी हिताच्या असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शॉपिंग का देण्यात आले नाही यावरही नरेंद्र पाटलांनी जोरदार टीकास्त्र केले कृषी उत्पन्न बाजार समितीला वैभव आणण्यासाठी व्यापारी शेतकरी हमाल मापाडी हे सर्व केंद्रबिंदू आहेत यांच्या सहकार्यानेच कृषी बाजार समितीला उच्च दर्जा प्राप्त होऊ शकते.
यावेळी सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून हमाल मापाडी व्यापारी व शेतकरी यांचे सत्कार समारंभ करण्यात आले अतिथींच्या सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रकांत सोनवणे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, व्यापारी हमाल मापारी शेतकरी एकत्र आले तर मार्केटची उन्नती राहणार नाही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आम्ही आणत आहोत परंतु शेतकऱ्यांनी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत द्यावे बाहेरच्या बाजार समितीला घेऊन जाऊ नये असा सल्लाही यावेळी दिला.
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर देखील जोरदार टीकास्त्र केले सहकारात राजकारण नको मागील दूध दही काय केले ताक वाल्यांनी काय केले हे विसरून जाऊ व मार्केट कसं सर्वोत्तम होईल ताक पाजून अफूची जशी नशा होते तशी नशा ताक पाजून केली म्हणून येथील शेतकऱ्यांना नेहमीच वेटिस धरले सव्वा दोनशे कोटी रुपयांचे मंजुरी नामदार गुलाबराव पाटलांनी दिल्यामुळे या तालुक्याच्या विकासाच्या बॅक लॉक भरून निघेल भरून निघेल अशा विविध विकासकामांचे उहा पो त्यांनी केला यशस्वीतेसाठी एम व्ही पाटील, ए के गंभीर, माणिकचंद महाजन, शांताराम पाटील, कांतीलाल पाटील, नारायण पाटील , राजेन्द्र जैस्वाल नितीन पाटील ,कूनाल पाटील, विकास पाटील, आदींनी मेहनत केली.