धरणगाव (प्रतिनिधी) घरगुती वादातून दोन गटात हाणामारी झालीय. या प्रकरणी दोन्ही गटातील ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पहिल्या फिर्यादीत कैलास बन्सी चव्हाण (वय २९, रा. संजय नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासरे सलीम शे. शब्बीर, शालक साहिल शे.सलीम, पत्नी प्रमिला कैलास चव्हाण आणि साली या सर्वांनी एकलग्न गावी ५ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरगुती भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करत रॉडणे व सुरीने वर करून उजव्या पायास दुखापत करत चापटा -बुक्क्यांनी मारहाण केल्याचे कैलास चव्हाण यांनी म्हटले आहे.
तर दुसऱ्या तक्रारीत विनयभंग झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार ५ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कैलास चव्हाण, कलाबाई बन्सी चव्हाण, विलास बन्सी चव्हाण, विलास बन्सी चव्हाण, जितु बन्सी चव्हाण यांनी शिवीगाळ केली. तसेच कैलास चव्हाण याने घरात येऊन अश्लील संभाषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच कैलासला घरातून बाहेर काढून दिल्यानंतर दारुच्या नशेत रस्त्यावर चालता चालता जोराने पडुन त्यांचा पाय फॅक्चर झाला. तर पिडीतेची बहिण, भाऊ व वडील यांना मारुण टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भातही चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोहेका नाना ठाकरे हे करीत आहेत.