जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व विद्यापिठाच्या आवारात केलेल्या बेकायदेशीर जमाव जमवून उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांचा पुतळा जाळल्यामुळे विद्यापीठ परिसरातील शांतता भंग करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संबधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदन देवून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू होवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहे. परंतु भारतीय युवा मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रातिनिधीक पुतळा दहन केला आहे. तसेच विद्यापीठात देखील काही संघटनांनी विद्यापीठ सुधारणा विधेयकाची होळी केली असल्याने शांतता भंग केला आहे. सुरक्षा रक्षक असतांना विद्यापिठात विद्यार्थ्याशीवाय अन्य कुणाला प्रवेश नसतांना दोनशे ते तीनशे लोकांनी तेथे गोंधळ घातला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने देखील कर्तव्यात कसुर केला असुन त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा व बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अॅड. कुणाल पवार, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, रोहण सोनवणे, विराज कावडीया, पियुष गांधी, स्वप्नील परदेशी, राजेश वारके प्रशांत सुरळकर, अमोल मोरे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी यांच्या स्वाक्षर्या आहेत.