पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) सांगवी भागातील मधुबन सोसायटी मधील मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या विजेता ठरलेल्या विशाखा सोनकांबळे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे पिंपरी -चिंचवड शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी भागातील मधुबन सोसायटीमधील राहत्या घरात विशाखा सोनकांबळे यांनी सोमवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. विशाखा सोनकांबळे ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या. तसंच त्या मिस पिंपरी – चिंचवड स्पर्धेच्या मानकरी देखील ठरल्या होत्या. विशाखा या आपल्या पती दीपक सोनकांबळे आणि दोन मुलांसह मधूबन सोसायटीमध्ये राहत होत्या. रविवारी रात्री विशाखाचे पती आपल्या मुलांसोबत घेऊन हॉलमध्ये झोपले होते आणि विशाखा आतमध्ये रूममध्ये झोपून होती. त्या दरम्यान विशाखाने अगोदर हाताची नस कापली नंतर गळफास घेतला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी विशाखा सोनकांबळे आत्महत्या संदर्भात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.