TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्र भूमिपूजन !

येणाऱ्या काळात कौशल्य शिक्षणावर खर्च; देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपलं राज्य देणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
August 5, 2024
in अमळनेर, राज्य, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होते. त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आ. शिरीष चौधरी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे,प्र कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाबरोबर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी अमळनेरच्या उपकेंद्रात त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व्हावी. या केंद्राचे बांधकाम लवकरात लवकर होईल हे पाहावे, रेल्वेच्या 11 हजार जागांची भरती निघणार आहे. अशा विविध स्पर्धा परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होत नाहीत.त्यामुळे केंद्राच्या नोकऱ्यामध्ये आपली मुलं, मुली दिसत नाहीत.त्यामुळे विनाविलंब हे केंद्र सध्या भाड्याच्या जागेत सुरु करा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
आपल्याकडे शिक्षणासाठी इमारती उभ्या करतो पण अभ्यासासाठी लागणारा ज्ञानसाठा ( कन्टेन्ट बिल्डिंग ) उभा करण्यात कमी पडतो, ते आता उभं करणं गरजेचे असून जगभरातल्या भाषा आपल्या विद्यार्थ्यांना यायला हव्यात, अनेक देशांना आपल्याकडून उत्तम मनुष्यबळाची आवश्यकता आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या दृष्टीने शासन शिक्षणात अमुलाग्र बदल करत असल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जळगाव जिल्हाधिकारी यांचे कौतुक

जळगावचे सध्याचे जिल्हाधिकारी पुण्याला जिल्हा परिषदेला मुख्यकार्यकारी अधिकारी होते. त्यांचा काम करण्याचा वेग मोठा असून अत्यंत सक्रिय होऊन नव्या नव्या कल्पना राबवून काम करतात. असे सतत कार्यात मग्न असणारे अधिकारी कमी आहेत. केवळ दोन महिन्यात त्यांनी महसूलची जागा अत्यंत तत्परतेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला हस्तांतर केली असे सांगून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नामदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले.

आमचा तालुका आवर्षणग्रस्त असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च पालकांना झेपणारा नाही. त्यामुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अमळनेरचे मुक्त विद्यापीठाचे हे उपकेंद्र अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. खान्देशात जसे मुक्त विद्यापीठाचे केंद्र झाले तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापनासाठी एक प्रशिक्षण केंद्र तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. तसेच कमी पावसाचा तालुका असलातरी येत्या काळात पाडळसरे धरण होईल त्यावेळी अमळनेर पाणीदार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून

जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या या उपकेंद्राचा फायदा होईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले तर सिनेट सदस्य, बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक राजेश पांडे यांनी अमळनेर मध्ये हे उपकेंद्र सुरु होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी आपल्या प्रास्ताविकात या उपकेंद्राचे बांधकाम येत्या आठ महिन्यात पूर्ण करू असे सांगून इथे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र आणि कौशल्य विकास केंद्रही स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerYashwantrao Chavan Open University Sub Center Bhumi Pujan at Amalner!

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

अत्याधुनिक सी.टी.स्कॅन मशीन खरेदीस मान्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित !

December 10, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ६ ऑक्टोबर २०२२ !

October 6, 2022

वसुंधरा संवर्धनात भूगोल अभ्यासकांची महत्त्वपूर्ण भूमिका: प्राचार्य डी. ए. सूर्यवंशी

January 15, 2025

मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा ; दोन दिवसात निर्णय घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group