TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी मोदी आणि उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतरच मी घेईन : प्रकाश आंबेडकर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी कोरोनाची लस घ्यावी, त्यानंतर मी घेईल असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. आज देशात सर्वत्र कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. दरम्यान, या लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद शहरात आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ‘केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाहीन बाग सारखे किसान बाग आंदोलन येत्या २७ जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका आणि प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते की, आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील ६० टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे’, असं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना संभाजीनगरच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. तर काँग्रेसनं संभाजीनगरच्या नावाला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा या मागणीला अँटी मुस्लिम भुमिकेचा वास येत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. शहराचं नाव बदलायचं असेल तर लोकांचं मत जाणून घ्या, त्यासाठी मतदान घ्या, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. पाण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टार्गेट करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या औरंगाबादकरांना 9 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ते आम्ही २ दिवसांवर आणू, असं आश्वासन आंबेडकरांनी दिलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात राज्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्या कोविड योद्धा व्यक्तीला लस देण्यात आली. यावेळी मुंबईत कोविड 19 संक्रमण काळात संसर्ग झालेल्या रुग्णांची स्वत: चा जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांना पहिल्यांदा कोविशिल्ड लस टोचण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी नोंदणी करणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फेसर्डी’ जिल्हा परिषदेच्या शाळेत मान्यवरांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप !

June 26, 2022

मोठी बातमी : पंकजा मुंडेंशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार ; आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ !

January 27, 2023

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर ६ महिन्यांपासून अत्याचार !

October 3, 2024

धरणगावच्या १९ माजी नगरसेवकांवर सव्वा कोटीच्या नुकसानीचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी !

November 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group