जळगाव (प्रतिनिधी) जळगाव, पाचोरा सीआरएमएस संघटनेच्या कार्यालयात सचिव गणेश कुमार सिंग यांच्या हस्ते नुकतेच ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिवसानिमित्त जळगाव पाचोरा सीआरएमएस त्या कार्यालयात सकाळी सीआरएमएस शाखेचे सचिव गणेश कुमार सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जळगाव स्टेशनच्या अधीक्षक अग्रवाल व त्यांचे सहकारी आरपीएफ इंस्पेक्टर आरसी पटेल यांच्यासह आरपीएफ कर्मचारी, जीआरपी CRS कल्पना कुलकर्णी, कमर्शियल स्टाफ इम्रान खान, S&T स्टाफ, पियुष माहेश्वरी, इंजिनिअरिंग स्टाफ, मनीष शर्मा याचबरोबर समस्त सफाई कर्मचारी वाल्मिक बोरसे, चंद्रकांत सपकाळे, प्रदीप पाटील, निलेश बोरनारे, यांच्यासोबत जळगाव पाचोरा सीआरएमएस शाखेचे पदाधिकारी, व रेल्वे डेपोचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जळगाव पाचोरा सीआरएमएस या शाखेने केलेल्या कार्याची माहिती गणेश सिंग यांनी दिली. यासोबतच त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना केले की, आपण आपल्या परिवाराचे रक्षण केले पाहिजे. बदलत्या हवामानामुळे अनेक आजार पसरत आहे. त्यामुळे या आजारांपासून वाचले पाहिजे, सुरक्षित राहिले पाहिजे, प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याने घराबाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे, त्याबरोबर हेल्मेट व फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावलाच पाहिजे अशा सूचनाही केल्या.