TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्रकारांच्या महत्वाच्या पाच मागण्यांसाठी २८ ऑगस्ट रोजी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2023
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्यवेधण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटने तर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या सोमवारी (ता.२८) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या कुशल नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे .जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल,कार्याध्यक्ष डिगंबर महाले, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष रविंद्र नवाल,महानगराध्यक्ष राजेश यावलकर, रेडिओ विंग चे अध्यक्ष अमोल देशमुख, ऊर्दू विंग चे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, डिजिटल विंगचे अध्यक्ष विजय वाघमारे ,ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे .

मागण्या खालीप्रमाणे आहेत !

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.

राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी.

माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियोआणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.

अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी.

सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी. जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

मागण्या पूर्ण न झाल्यास १०८ रुग्णवाहिका चालक करणार एक तारखेपासून चक्काजाम आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाडक्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परताना पित्यासोबत घडलं भयंकर !

April 26, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2025

April 8, 2025

शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; मोदींच्या बड्या मंत्र्याचा गंभीर आरोप

December 12, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2025 !

October 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group