चाळीसगाव (प्रतिनिधी) गावामध्ये आतापर्यंत सामाजिक, राजकीय, प्रशासकीय असे अनेक कार्यक्रम आपण बघितले पण एक किलबिल पालक मेळावा प्रथमच आपल्या कार्यकाळात झाला तुम्ही आयोजित केला त्याबद्दल मेहुणबारे बिट पर्यवेक्षिका श्रीमती प्रिती भूषणकुमार देवरे यांचे माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे यांनी कौतुक केले.
तालुक्यातील मेहुणबारे येथे दि. 25/2/25 रोजी सकाळी 11 वाजता एकात्मिक बालविकास सेवा योजना चाळीसगाव प्रकल्प 1 अंतर्गत मेहुनबारे बिट व अतिरिक्त पिलखोड बिट च्या पर्यवेक्षिका प्रिती भूषणकुमार देवरे, खेडगाव अतिरिक्त दहिवद बीट च्या पर्यवेक्षिका वहिदा जहांगीर तडवी, लोंढे अतिरिक्त शिरसगाव बीटच्या पर्यवेक्षिका युगंधरा राजेंद्रसिंग पाटील यांनी तालुक्यातील मेहुणबारे येथे आरंभ अंतर्गत किलबिल पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून पियुष साळुंखे बोलत होते. ते म्हणाले की पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती देवरे यांनी सांगितल्या प्रमाणे आजच्या धकाधकीच्या जीवनात आज टेक्नॉलॉजी वाढली. मोबाईल वाढले यात मुलांना शारीरिक व्यायाम असेल ते मुली मुलं आज विसरले आहेत या टेक्नॉलॉजीच्या बाहेर जावून मुलांना संस्कार वाढवायचे असतात तर नक्कीच तुमच्याद्वारे हे नवीन उपक्रम घेवून केले जात आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवींद्र साळुंखे, राजू शेठ शब्बीर, गौतम दगडू चव्हाण, शरद वाघ ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार सूर्यकांत कदम, तलाठी मॅडम, सीएचओ उत्कर्ष राठोड, बचत गटाच्या सीआरपी उदया पवार प्राजक्ता भरते एन एम, राजू पाटील, वरिष्ठ सहाय्यक कविता जाधव, पर्यवेक्षिका शितल निंबाळकर रुचिका कोळीतकर, डाटा ऑपरेटर बाळासाहेब खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते राजमाता जिजाऊ, सरस्वती माता यांचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार पर्यवेक्षिका प्रिती भूषणकुमार देवरे, पर्यवेक्षिका वहिदा जहांगीर तडवी, पर्यवेक्षिका युगंधरा राजेंद्रसिंग पाटील यांनी केला. प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती देवरे यांनी केले. त्या म्हणाल्या की माझ्या अंगणवाडी सेविकांनी फक्त काही दिवसात या सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केले. किलबिल पालक मेळावा घेण्यासाठी आम्हाला सरपंच रवींद्र साळुंखे, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी अंगणवाडी च्या समस्यांबाबत सहकार्य केले.
टेक्नॉलॉजी च्या काळात गर्भसंस्कार शिशु संस्कार बालसंस्कार करणे देखील महत्वाचे असून आमच्या बिट मध्ये सुदृढ बालक व महिला यांना चांगली सेवा देण्याचा माझा मानस असेल, असे सांगत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, बचत गटाच्या महिला जे कार्य पार पाडत आहेत असे कार्य कोणी पार पाडू शकत नाही. आपण आपले 5/7 लोकांचे कुटुंब सांभाळू शकत नाही मात्र आमच्या अंगणवाडी ताई गावातील प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक घराची मुलांची माहिती घेतात शिवाय खूप कमी वेळेत सर्वांनी खूप छान कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल श्रीमती देवरे यांनी सर्वांचे आभार मानले तसेच कार्यक्रमास प्रभारी CDPO साधना कापडणी व शोभना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत कडून मान्यवरांचे हस्ते अंगणवाडी बिटला 27 कोठ्या देण्यात आल्या.