मुंबई (वृत्तसंस्था) फोर्ब्सनं आशिया खंडातील १०० डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारनं या यादीत स्थान मिळवलं आहे. फक्त सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केलं म्हणून नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या कारणामुळंही त्याची इथं निवड करण्यात आली आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार अक्षय कुमारनं यंदाच्या वर्षी जवळपास ३६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. फोर्ब्सनं आशिया खंडातील १०० डिजिटल स्टार्स अर्थात कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगभरातील अशा कलाकारांच्या नावाचा समावेश आहे, ज्यांनी चित्रपट, गीतं, मालिका, सीरिजसोबतच सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांतूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विक्रमी फॅन फॉलोविंग असणाऱ्या काही नावांचाही या यादीत समावेश आहे. कोरोना काळात हताश झालेल्या वर्गाशी संपर्कात राहत त्यांतं सातत्यानं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावाचाही यात समावेश केला गेला आहे. फोर्ब्सच्या या यादीत अक्षय कुमार सहाव्या स्थानावर आहे. फक्त सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करतो म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या कारणामुळंही त्याची इथं निवड करण्यात आली आहे.