बेंगळुरू (वृत्तसंस्था) बंगळुरू पोलिसांनी एका इलेक्ट्रिकल शॉपच्या सेल्समनला ऑनलाइन “वाईफ-स्वॅपिंग” व्यवसाय केल्याबद्दल अटक केली आहे. त्याच्यावर तो इंटरनेटवर (Crime on Internet) ‘वाईफ स्वॅपिंग’ सेवा देण्याबाबत बोलत असल्याचा आरोप आहे. यासाठी बेंगळुरू येथील या दाम्पत्याचे गॅजेट्सही जप्त करण्यात आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला पॉर्न (porn addiction) पाहण्याचं व्यसन होतं, आणि तो त्याच्या पत्नीलाही पॉर्न व्हिडीओ पाहण्यास भाग पाडत असे.
याप्रकरणी डीसीपी श्रीनाथ महादेव जोशी यांनी माहिती दिली की, ‘विनय ट्विटरवर वाईफ स्वॅपिंग म्हणजे पत्नींची आदला-बदल करण्याबद्दल मेसेज टाकत असे. जेव्हा ग्राहक त्याच्याशी संपर्क साधत, तेव्हा तो त्यांना पुढील संभाषणासाठी टेलिग्राम आयडी देत होता. ग्राहक वाईफ स्वॅपिंग करण्यास तयार असेल, तर आरोपी त्यांना घरी बोलावत असे.’ पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने लोकांशी संपर्क साधण्यासाठी महिलेच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट बनवलं होतं. आरोपी विनय विवाहित असून त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. त्याला पॉर्नोग्राफीचं व्यसन होतं आणि तो त्याच्या पत्नीलाही पॉर्न पाहण्यास भाग पाडत असे. नंतर या जोडप्याने ‘वाईफ स्वॅपिंग’ सारखा घाणेरडा प्रकार सुरू करण्याचा निर्णय घेतला.’
आरोपीचे इलेक्ट्रॉनिक सिटीजवळ घर असून तिथेच त्याचे ग्राहक येत होते. इथे तो त्याचे वैयक्तिक व्हिडीओही बनवत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या जोडप्याकडून विविध गॅजेट्सही ताब्यात घेतली आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या गॅजेट्स मधून कोणकोणती माहिती मिळते, यावर पुढील तपासाची दिशा अधिक स्पष्ट होऊ शकते.