TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूतकाळ विसरा, स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती वाढवा : डॉ. सतिष पाटील

'आयएमए'तर्फे तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना होऊन गेल्यानंतर आपल्या मनात अनेक विचार येतात परंतु आपण या आजारातून बाहेर पडलो असून पुन्हा आजार होणार नाही अशी सकारात्मकता बाळगा. भूतकाळ विसरून स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती अधिक बलवान करा, असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. सतिष पाटील यांनी दिला.

जळगाव आयएमएतर्फे जिल्हावासियांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते कोरोना पश्चात स्वास्थ आणि मनशांती या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी. चौधरी आणि सचिव डॉ. राधेश्याम चौधरी हे देखील सहभागी झाले होते.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी.जी. चौधरी यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, जळगाव आयएमएतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचा जळगावकरांना चांगला लाभ होत आहे. नागरिकांचे मनोबल उंचविण्याचा आणि कोरोनाची भिती घालवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएमएचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी म्हणाले की, कोरोना रुग्णांना औषधोपचाराचा बरोबर रुग्णांना समुपदेशनाची, मानसिक धीर देण्याची आवश्यकता असते. रुग्णांना सहानुभूती दर्शवली पाहिजे. कोरोना दरम्यान आणि कोरोना पश्चातही आपण स्वतःचे स्वास्थ चांगले राखणे, सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले.

मुख्य वक्ते डॉ.सतिष पाटील यांनी दुसरे पुष्प गुंफतांना सांगितले की, कोरोना पश्चात अनेक व्यक्तींच्या स्वभावात, वागण्यात आणि बोलण्यात बदल होतो. अनेक रुग्ण कोरोनावर मात करतात परंतु त्यानंतर त्यांची मानसिक हिंमत खचते. रुग्णांनी स्वतःची अंतर्मनाची शक्ती वाढवली पाहिजे. स्वतःच्याच मनाशी सकारात्मक गोष्टी बोलल्या पाहिजे. हवेतल्या गोष्टींपेक्षा, अवास्तव भीतीपेक्षा वास्तवाशी संपर्क ठेवला पाहिजे. सकाळी लवकर उठण्यासाठी प्रयत्न करा. रात्री झोपेची गोळी घेणे टाळा, पाणी, झोप, विश्रांती पुरेसे घ्या. नियमीत व्यायाम करा, असे त्यांनी सांगितले.

लहान-लहान छंद जोपासा, मन वळवा

कोरोना आजार होऊन गेल्यानंतर त्याचे रिपोर्ट, औषधी यांचे विचारमंथन, चर्चा करत बसू नये. नातेवाईकांनी देखील रुग्णांना धीर द्या. मनातील संतापाला वाट देण्यासाठी अंक १०० पासून उलट मोजा, दोन्ही हाताची बोटे एकमेकात घट्ट अडकवून ओढा, नादुरुस्त मोबाईल, बंद रिमोट सोबत ठेवा, त्याची बटणे दाबा, जुन्या पोस्टरवर शाई शिंपडून स्वतःचा संताप काढा. डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचारसह मानसिक आधार द्या त्यांचे समुपदेशन करा, असे आवाहन डॉ.सतिष पाटील यांनी केले.

कोरोना विषयी असलेल्या विशेष व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प उद्या दि.११ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ.प्रदीप जोशी हे गुंफणार आहेत. नागरिकांनी त्याचा ऑनलाईन लाभ घेण्याचे आवाहन आयएमएतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद ; मांडले महत्त्वाचे मुद्दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील विक्रम ग्रंथालय येथे आरोग्यभारतीतर्फे धन्वंतरी पूजन !

November 13, 2020

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 08 जानेवारी 2026 !

January 8, 2026

महावितरणने मागणी केलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मासिक हप्ते मिळू शकतात : प्रताप होगाडे

April 24, 2022

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत “मैं भी डिजिटल ४.०” मोहिमेचा लाभ घेण्याचे पथविक्रेत्यांना आवाहन !

February 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group