जळगाव (प्रतिनिधी) पुर्वीचा एरंडोल विधानसभा मतदार संघाचे माजी आ. महेंद्रसिंग पाटील यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावेळी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह रमेश पाटील उपस्थित होते.
जनता दलाचे आमदार म्हणून महेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल विधानसभेतून आमदारकी भुषविली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, कालातंराने ते सहकार क्षेत्रात सक्रीय होवून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवडून आले होते व व्हाईस चेअरमणपद भुषविले होते. महेंद्रसिंग पाटील यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतल्याने ते पुन्हा राजकारणात सक्रीय होणार काय? असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, या भेटीमध्ये अनेक विषयांबाबत चर्चा करण्यात केल्याचे कळतेय. परंतू नेमकी काय चर्चा झाली?, याबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही.