मुंबई (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचे (Andrew Symonds) निधन झाला आहे. वयाच्या 46 व्या वर्षी सायमंड्सचे कर अपघातात निधन झाले आहे. सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.
शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अँड्र्यू सायमंड्सच्या कारला अपघात झाला. अँड्र्यू सायमंड्स याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. संपुर्ण देशात अँड्र्यू सायमंड्सचे चाहते होते. जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सायमंड्सला वाचवण्याचा डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. घटनास्थळी एका इसमाला वाचवताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचे समोर आले आहे. अपघाता झाला त्यावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसह क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.