TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडके बालगृह लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण ; बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खडके येथील बालगृहातील अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आता चक्क बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरूवारी नव्याने तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले. या मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींनी चार महिन्यापूर्वी बाल कल्याण समिती, संस्थेचे अध्यक्ष आणि तेथील शिक्षकांकडे तक्रार केली होती. परंतू यापैकी कुणीही दखल घेतली नसल्याने या सर्वावर गुरुवारी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात तीन अल्पवयीन पीडित मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा आरोपी गणेश पंडित याच्यासह बाल कल्याण समितीच्या बोरनारे मॅडम, देवयानी मॅडम, तळईचे शिक्षक प्रताप सर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही नावे बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्या विद्या बोरनारे, संदीप पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादाजी उर्फ प्रभाकर यशवंत पाटील, तळई येथील शिक्षक प्रताप सर उर्फ प्रमोद पाटील अशी असून त्यांच्यावर कलम ३५४, ३७६, ३२३, ५०४, ५०६, पोस्को अंतर्गत ४,५,६,८,९, १९, २१ तसेच बाल अधिनियम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

समितीच्या सदस्यांचे नोंदवले जाबजबाव !
पोलीसांनी या प्रकरणात गुरूवारी एरंडोल पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी सुनिल नंदनवार, पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांनी बाल कल्याण समितीतील काही सदस्यांचे जाबजबाब घेतले. त्यानंत आरोपी गणेश पंडित यांच्यासह मुलींच्या तक्रारीची दखल घेतल्याने संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक आणि बाल कल्याण समितीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

केअरटेकर, संस्था अध्यक्ष व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा !
तालुक्यातील खडके बुद्रुक येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत काळजीवाहकाने एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणात केअरटेकर, संस्था अध्यक्ष व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच अल्पवयीन मुलींसह बालकाचेही शोषण !
खडके बुद्रुक येथे तळई येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ मुला-मुलींचे के बालगृह आहे. या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात काळजीवाहक गणेश पंडित हा पोलिस कोठडीत आहे. शनिवारी बालगृहातील ११ वर्षीय बालकानेही पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.

काय म्हटलंय नेमकं तक्रारीत !
होळीच्या दिवशी अल्पवयीन बालकाने त पाणी भरले नाही म्हणून वसतिगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित याच्या सांगण्यावरून आठ विधिसंघर्षित बालकांनी पीडित बालकास लाथाबुक्क्यांनी पाठ, छाती व पोटावर मारहाण केली होती. तसेच एका रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिडीत बालक वॉशरुमला गेला असताना गणेशने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केला. ही घटना संस्थेच्या अध्यक्ष व शिक्षकांना सांगितली पण त्यांनीही दुर्लक्ष केले. जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीनंतर अल्पवयीन बालकावरदेखील अत्याचार केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन बालकांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.

मारहाण करणाऱ्या आठ मुलांविरुद्ध गुन्हा !
पीडित बालकाच्या तक्रारीवरून काळजीवाहक गणेश पंडित, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील, भूषण प्रभाकर पाटील यांच्यासह बालगृहातील आठ अल्पवयीन बालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन व भूषण फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर काळजीवाहक शिवाजी पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

अल्पवयीन बालिका खून प्रकरण ; पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, तीन कर्मचारी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे… दंश केलेल्या कोब्रासोबत १० किमीचा प्रवास करत सर्पमित्राने गाठलं रुग्णालय !

November 15, 2021

धक्कादायक : ‘राज्यातील वातावरण बिघडवण्यासाठी बाहेरील राज्यातून लोकं महाराष्ट्रात दाखल’

May 4, 2022

धरणगाव नूतन सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा लढत ; दिग्गज मैदानात !

June 10, 2022

खेळता खेळता मुलं कारमध्ये बसली अन्…एकाचवेळी दोन भावंडांचा मृत्यू ; मुंबईत काय घडलं ?

April 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group