चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)कमिटीच्या वतीने आज रविवार रोजी कस्तूरबा शाळेच्या आवारात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मनोगतात ॲड.भैय्यासाहेबांनी स्वर्गीय विलासरावजी यांचे सरपंच पदापासुन ते मुख्यमंत्री पदापर्यंत असताना त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील विविध अनुभव,त्याची कार्यकुशलता,संघटन, वक्तृत्वशैली,प्रशासकीय कामावरअसलेली पकड व दबदबा याबाबतीत कार्यकर्त्यांना अवगत केले. तसेच स्वर्गीय देशमुख साहेबांचा वारसा अतिशय उत्कृष्ठपणे पाऊलावर पाऊल ठेवत आमदार अमित देशमुख साहेब व धीरज देशमुख साहेब सांभाळत असल्याचे ॲड. भैय्यासाहेबांनी सांगीतले.
यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,चोसाका संचालक गोपाल धनगर,सुतगिरणी संचालक,ॲड.एस.डी.पाटील ,शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण पाटील,माजी नगरसेवक प्रा.विलास दारूंटे,पंचायत समिती माजी सभापती प्रमोद झूलाल पाटील, कृषि सेल अध्यक्ष शशिकांत साळूखे,युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे,बी.एम.पाटील ,प्रा. विक्रम पाटील,रमाकांत सोनवणे,हातेड बु वि.का.सोसायटी संयालक प्रतापराव सोनवणे,सतिष कपुरचंद पाटील, यशवंत खैरनार, अकबर पिंजारी, जे.आर.पाटील, शरद मोरे, अशोक बबनराव सोनवणे, शांताराम लोहार, रविंद्र सोनवणे, रविंद्र कूड़ाळकर आदी पदाघिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.