धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या १०८ व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पी.एम.पाटील यांच्या वतीने शालेय दिनविशेष म्हणून अभिवादन करण्यासाठी ५० महापुरूषांच्या फोटो फ्रेम संच आज भेट दिला. पत्रकार योगेश प्रकाश पाटील यांनी हा संच मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या कडे सुपूर्द केला.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.के.सपकाळे, ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ, एनसीसी मेजर डी.एस.पाटील, यू.एस.बोरसे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.