TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक !

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

राहुरी (वृत्तसंस्था) तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेला विविध प्रकारची आमिषे दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री माजी आ. मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरून अटक करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एक ३५ वर्षीय महिला श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेतीकाम करत होती. यादरम्यान त्यांची ओळख झाली. यादरम्यान मुरकुटे यांनी पीडित महिलेला २०१९ मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर महिलेला घर, शेती घेऊन देतो, तसेच मुलाला नोकरी लावून देतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी अत्याचार केला. या घटनेबाबत महिलेने सोमवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. महिलेने फिर्याद दाखल करतेवेळी राहुरी पोलीस ठाणे येथे येऊन रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपीने केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ व फोटो असे पुरावे दाखवल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हा दाखल केला.

READ ALSO

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

फिर्यादीवरून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूरचे उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक समाधान साळुंके यांच्यासह राहुरी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे २५ ते ३० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने मंगळवारी पहाटे मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकून मुरकुटे यांना ताब्यात घेतले, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर मुरकुटे यांची राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली.

मुरकुटे यांना अटक झाल्याचे वृत्त श्रीरामपूरसह जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर अनेकांनी राहुरीकडे धाव घेतली. मुरकुटेंना अटक करताच कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मुरकुटे श्रीरामपूर मतदारसंघात तीन वेळा आमदार म्हणून राहिले आहेत. अशोकनगरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत, यासह अशोक सहकारी बँकेचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेबाबत जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Former MLA arrested in case of women abuse!Rahuri

Related Posts

गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
Next Post

अनोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात कोरोनाचा विस्फोट ; मागील २४ तासांत २,४७,४१७ कोरोनाबाधितांची नोंद, ३८० रुग्णांचा मृत्यू !

January 13, 2022

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ८५ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

June 29, 2021

सरकार अदानींना वाचवतेय, ते तुरुंगात असले पाहिजे : राहुल गांधी !

November 28, 2024

कोळसा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा ; उर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group