धरणगाव (प्रतिनिधी) भाजपाचे खासदार ए.टी. नाना पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी भाजपातर्फे अर्ज भरला आहे. त्यानंतर ए.टी. नाना पाटील यांनी धरणगाव भाजपा कार्यालयात जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, शिरीष आप्पा बयस, ओबीसी जिल्हा अध्यक्ष अँड. संजय महाजन, सभापती पुनिलाल आप्पा महाजन, युवामोर्चा तालुका अध्यक्ष निर्दोष पाटील, नगरसेवक शरद अण्णा कंखरे, नगरसेवक ललित येवले, ओबीसी तालुका अध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, शेखर पाटील, मिडिया तालुका प्रमुख टोनी महाजन, सरचिटणीस कन्हैय्या रायपूरकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष भूषण कंखरे, प्रसिद्ध प्रमुख किशोर महाजन, पिंटू आप्पा पाटील, समाधान पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.