जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल मोबाईलच्या जबरी चोरी गुन्ह्यातील चौघां संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. (Jalgaon Crime News)
प्रमोद कैलास धिवरे (रा. कंडारी, अशोक सम्राट नगर. ता. भुसावळ), मयुर संजय अंभोरे (रा. 15 बंगला भुसावळ, आकाश किशोर किरतकुरे (रा. कंडारी, अशोक सम्राट नगर ता. भुसावळ), आणि हितेंद्र उर्फ किट्टू राजु बोदाला (रा. झेडटीएस भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार अनिल जाधव, हे.कॉ. कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दिपक पाटील, पो.ना. संतोष मायकल, पो.ना. हेंमत पाटील व पो.कॉ उमेश गोसावी, चालक हे.कॉ. राजेद्र पवार आदींनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. तसेच पुढील तपासकामी चौघांना भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.