जळगाव (प्रतिनिधी) जबरी चोरी, हातभट्टी दारुची’, विक्री, हप्ता वसुलीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सचिन अभयसिंग चव्हाण (वय २४, रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा), नितेश उर्फ गोल्या मिलींद जाधव (वय २४, रा. मढी चौक पिंप्राळा), राहूल नवल काकडे (वय २४, रा. समतानगर) या तिघांसह संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) (वय २४, रा. कुसुंबा) याच्या एकूण चौघांवर एकाच वेळी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समता नगरात राहणारा सराईत गुन्हेगार राहुल काकडे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला यासह १३ गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच त्याच्यावर चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली असून एक अदाखलपात्र गुन्हा दाखल आहे. तर पिंप्राळ्यातील गुरुदत्त कॉलनीत राहणारा सचिन अभयसिंग चव्हाण याच्याविरुद्ध ७ गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई व दोन अदखलपात्र गुन्हे दाखल आहे. तसेच पिंप्राळ्यातील मढी चौकातील नितेश उर्फ गोल्या मिलींद जाधव याच्याविरुद्ध १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तिघे सराईत गुन्हेगार शहरवासीयांसाठी अतिशय धोकेदायक ठरले होते. या तीन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधारी, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलिस नाईक हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे – शाखेकडे पाठविला होता.
औरंगाबाद, पुणे, ठाणे कारागृहात चौघांची रवानगी !
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्थानबद्धतेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चारही जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संतोष राऊत याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. तसेच राहुल काकडे, सचिन चव्हाण यांना येरवडा, पुणे कारागृहात तर नितेश जाधव याला ठाणे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी या कारवाईचे काम पाहिले आहे..
हातभट्टीची दारु विकणारा बब्यावर एमपीडीए !
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुसुंबा येथे राहणारा संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत याच्याविरुद्ध दारुबंदी कलमांसह अन्य एकूण नऊ गुन्हे दाखल आहे. तसेच त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक करावाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पोकॉ साईनाथ मुंडे, संदीप धनगर यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता.