जळगाव (प्रतिनिधी) येत्या दोन दिवसांमध्ये खान्देशात अतिवृष्टीचा अाॅरेंज अलर्ट तर रविवार अाणि साेमवारी मुसळधार पावसाचा यलाे अलर्ट दिला अाहे.
खान्देशात चार दिवसापासून जाेर पकडलेला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अाणि विदर्भात देखील पावसाने चांगलाच बरसत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जळगाव तालुक्यात दाेन वेळा दमदार पाऊस झाला अाहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज अाहे. दरम्यान, जुलैत जिल्ह्यात सरासरी १८९.२ मिमी पाऊस हाेताे. ७ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३३.२ मिमी म्हणजे १७.५ टक्के पावसाची नाेंद झाली अाहे. ७ पैकी एकूण ६ दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक ३३.१ टक्के पाऊस जळगाव तालुक्यात झाला.