यावल (प्रतिनधी) तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर पश्चिम भागात वादळ प्रचंड होते तेव्हा या वादळात सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून सातपुड्याच्या जंगलात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील घर कोसळले यामध्ये चार जण जागीच ठार झाले आहे. तर या कुटुंबातील दहा वर्षाचा बालक हा बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी पथकासह रवाना झाले असून रात्री उशिरापर्यंत मृतदेह तेथून आणण्याचे कार्यवाही सुरू होती.
रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह यावल तालुक्यात पाऊस झाला यात तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा या गावापासून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावर प्रचंड वादळ आल्याने वादळामध्ये नानसिंग गुलाब पावरा वय 28 वर्ष यांचे घर कोसळले.या घरात नानसिंग पावरा सह त्यांची 26 वर्षीय पत्नी, तीन वर्षीय, मुलगा दोन वर्षीय मुलगा हे चार जण ठार झाले आहे तर त्यांचा 10 वर्षीय मुलगा बचावला आहे. या घटनेची माहिती वाघझिरा गावात देण्यात आली. तेव्हा त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग बारेला यांनी प्रशासनाला दिली. तेव्हा घटनास्थळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे पथकासह रवाना झाले आहे. रात्री उशिरापर्यंत चौघांचे मृतदेह तेथून शव विच्छेदन करिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.या घटनेमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.