जळगाव (प्रतिनिधी) हर्बललाईफ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून महिलेची ६६ लाख ४० हजार रुपयांची फसवणुक केली. सुरुवातीला गुंतवणुकीवर तब्बल २० लाख २४ हजार रुपयांचा नफा देवून दुबई दौऱ्यावर घेवून हजार रुपयांचा नफा देवून त्यांना दुबई दौऱ्या गेले. मात्र नंतर वेगवेगळ्या कारणाने उकळलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघ भावंडांसह त्यांचे आई-वडील व कंपनीच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील माहेर असलेल्या माधुरी अनिल चांदोरीकरण या अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहे. त्या मे २०२३ मध्ये पतीसह माहेरी आलेल्या असताना ते दोघे व मामेभाऊ हे मू.जे. महाविद्यालय परिसरातील चाय शाय बार कॅफे येथे अल्पोपहारासाठी गेले होते. त्याठिकाणी कॅफे चालक दिपेश कमलेश रुपाणी हा महिलेच्या मामेभावाचा मित्र असल्याने त्याने व दिपेश, त्याचे आई-वडील, भावाशी ओळख करून दिली. दीपेश, त्याची आई आशा रुपाणी, वडील कमलेश रुपाणी, भाऊ अशलेश रुपाणी यांनी माधुरी व त्यांच्या पतीला आम्ही हर्बललाईफ कंपनीचे अधिकृत वितरक असून तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करा, असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच त्यातून मिळणाऱ्या नफ्याचीही माहिती दिली. त्यानुसार महिलेसह त्यांच्या पतीने वेळोवेळी रुपाणी कुटुंबीयांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली. त्यानंतर कंपनीचे अधिकृत फिटनेस सेंटर सुरू करणे, नाशिक येथे क्क्कि सेंटर सुरू करणे अशा वेगवेगळ्या कारणांनी रक्कम घेत गेले. काही दिवसांनी त्यांना नफा म्हणून रक्कम जमा करत गेले. त्यानुसार गुंतवलेल्या रकमेवर २० लाख २४ हजार ९९४ रुपयांचा नफा दिला.
पैसे मिळत नसल्याने पोलीसात दिली तकार
वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत मिळत नसल्याने माधुरी चांदोरीकर यांनी १ मार्च २०२५ रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आशा रुपाणी, कमलेश रुपाणी, दिपेश रुपाणी, अशलेश रुपाणी व कंपनीचा कर्मचारी आकाश वर्मा या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.
कंपनीकडून दुबईची करवून आणली सैर
कंपनीकडून दुबई दौरा मिळाल्याचे रुपाणी याने सांगून माधुरी व त्यांच्या कुटुंबीयांना त्याठिकाणी फिरवूनही आणले. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या कारणांनी तो हा महिलेकडून रक्कम घेत गेला. काही दिवसांनी रक्कम परत मागितली असता लवकरच रक्कम मिळेल असे सांगत नंतर धनादेश दिला. चांदोरीकर यांनी तो वटविण्यासाठी बँकेत टाकला मात्र तो देखील बाऊन्स झाला.