पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील एका मोबाईल दुकानदाराची मोबाईल विक्रीच्या नावाखाली ४९ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात महेश पहलाज वादवाणी (वय ३२, धंदा व्यापार, रा.जामनेर रोड, शिंदी कॉलनी पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश वादवाणी यांना FLIPKART AMZON STOCK, MI REAALME, SAMSUSNGM, OPPO, VIVO या कंपनीच्या मोबाईलचा स्टॉक आहे, असा मेसेज ८३५७८२५५९८, ८६२४९४३५७७ आणि ९०३९८७८०५६ या मोबाईल नंबरवरून आलेत. त्यानुसार वादवाणी यांनी ९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरच्या काळात वेळोवेळी ४९ हजार रुपये ऑनलाईन ‘फोन पे’व्दारे पाठवले. परंतू त्यांना मोबाईलचे पार्सल आले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वादवाणी ८३५७८२५५९८, ८६२४९४३५७७ आणि ९०३९८७८०५६ या मोबाईलधारक अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकाँ निवृत्ती मोरे हे करीत आहेत.