जळगाव (प्रतिनिधी) फेसबुकरुन पुजा व हरीष झवर या दाम्पत्याचे फोटो मिळवून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फेसबुकरुन पुजा व हरीष झवर या दाम्पत्याचे फोटो मिळवून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा प्रकार गतवर्षी उघडकीस आला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित दिनेश रामचंद्र उर्फ रमेश तिवारी (रा. एसएमआयटी कॉलेज परिसर) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तिवारी याने अटकपूर्व जामीनासाठी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली होती. जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.