जळगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात जीपीएस मित्र परिवारातर्फे आज भोकर येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोकर परिसरातील 105 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच यातील 34 रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल पाठविण्यात आले. तसेच या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देखील दिली.
पालकमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान !
जळगाव तालुक्यातील भोकर येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज (दि. 2 ऑगस्ट) रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. तसेच शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराचा 105 रुग्णांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला तर यातीलच 34 रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशनसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. या रुग्णांना मिनी लक्झरीद्वारे रवाना करण्यात आले असून या रुग्णांची जेवण व निवासाची सोय देखील करण्यात आली आहे.
रुग्णांसह नातेवाईकांनी गुलाबभाऊंचे मानले आभार !
भोकर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच यावेळी आलेल्या रुग्णांसह नातेवाईकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभार मानले. याप्रसंगी सुभाष आप्पा, बालाशेठ, अरुण भाऊ, रवींद्र रघुनाथ, सरपंच भिमराव सोनवणे, ऍड. विवेक पाटील, भोलाभाऊ, अनिल भागवत, प्रमोद सोनवणे, लोटन दाजी, मोना बाविस्कर, सचिन लाठी, सुभाष टेलर, अशोक विश्राम, वसंत गोपीचंद, समाधान सोनवणे, आधार चौधरी, अशोक पाटील, भागवत आप्पा तसेच गाढोदा सरपंच योगराज बापू, भादलीचे कमलाकर बोरसे, पळसोद येथील भगवान पाटील आदी उपस्थित होते.