नाशिक (वृत्तसंस्था) क्षुल्लक कारणावरून भर मैदानात दोन तरुणींची फ्री स्टाइल (girl Freestyle fight) हाणामारी झाल्याची घटना नाशिकमध्ये (nashik) घडली आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात प्रचंड वेगाने व्हायरल (video viral) झाला असून याबाबत विविध चर्चांना ऊत आला आहे.
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. दुपारच्या सुमारास कॉलेजच्या मैदानावर दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली. दोन्ही तरुणींमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. बघता बघता दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. यावेळी या दोन्ही तरुणींच्या काही मैत्रिणीही घटनास्थळावर हजर होत्या. पण दोन्ही तरुणींमध्ये फ्री स्टाइल हाणामारी सुरू झाली. दोघींनी एकमेकांना चापटा आणि लाथा मारल्या. त्यानंतर एकमेकांचे केस धरून ओढताण सुरू होती. वाद विकोपाला गेला हे लक्षात आल्यावर त्यांच्या मैत्रिणींनी मध्यस्थी केली आणि दोघींना बाजूंना नेलं. या मुली कोणत्या कारणावरून भांडत होत्या हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.