धरणगाव (जयेश महाजन) हिंदुरुदय सम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृति दिनानिमित्त गुरुवारी शिवसेना शहर शाखेतर्फे धरणगाव शिवसेना कार्यालयात प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून स्व.बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, नगरसेवक जितेंद्र धनगर, किरण मराठे, अँड शरद माळी, उप जिल्हा प्रमुख भागवत चौधरी, शहर प्रमुख धीरेंद्र पुरभे, शहर प्रमुख भरत महाजन, उप तालुका प्रमुख, रवींद्र जाधव, उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री, उपशहर प्रमुख गजानन महाजन, विभाग प्रमुख बापू महाजन, शहर संघटक गोपाल महाजन, युवासेना उप शहर प्रमुख पांडुरंग जाधव, शिवसैनिक प्रकाश मुकरदम पाटील, संतोष सोनवणे, राजेद्र बोरसे, दिलीप महाजन, भगवान महाजन, वासुदेव महाजन, सतिष बोरसे, दिनेश येवले, प्रकाश जाधव, सचिन सोनवणे, राहुल रोकडे, राहुल चव्हाण, नगराज पाटील,स्वप्नील महाजन, विनोद रोकडे, शिवसेना कार्यालय प्रमुख गणेश महाजन, राजमल संचेती, श्याम ललिता पाटील यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते.