अमळनेर (प्रतिनिधी) येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी पर्यवेक्षक डिगंबर महाले यांना ३० रोजी मुख्याध्यापकपदाची पदोन्नती मिळाली आहे.
येथील मुख्याध्यापक प्रकाश मेखा हे निवृत्त झाल्याने त्या रिक्त जागी महाले यांची नियुक्ती झाली आहे. महाले हे ज्येष्ठ पत्रकार, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते सात टर्म व २१ वर्षे संस्थेचे बिनविरोध शिक्षक प्रतिनिधी होते. तसेच जी.एस. हायस्कूलचेच माजी विद्यार्थी असून विद्यार्थिदशेत ते शाळेचे अध्यक्ष होते. ते याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शाळेचे पर्यवेक्षक झाले व त्याच शाळेत आता मुख्याध्यापकपदी विराजमान झाले आहेत. असे अनेक अनोखे योग महाले यांच्याबाबत जुळून आले आहेत. त्यांचे संस्थेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.