परभणी (वृत्तसंस्था) नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक करत ते अतिशय हुशार व्यक्ती असल्याचं म्हटलं. यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्लाही दिला. सबका साथ सबका विकास याप्रमाणे एकत्र राहा असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना कोश्यारी यांनी नितिन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. “नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात,” असं त्यांनी नमूद केलं. “बांबू लागवडीला गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या,” असा सल्ला कोश्यारी यांनी कुलगुरूंना दिला.