धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानुसार पोलिसांनी चार जणांची एक टोळी पकडली आहे. चोरट्यांनी आतापर्यंत धुळ्यातून ७ मोटार सायकल काढून दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावरच होते. परंतू गुरुवारी (१९ मे) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी लांबवली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयिताना पकडले. मग काय एक-एक करत चार संशयित आरोपी समोर आले. खाक्या दाखवताच चोरट्यांनी गुन्हा कबूल करत धुळ्यातून ७ मोटार सायकल काढून दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी ‘प्रसाद’ दिल्याबरोबर सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार चोरट्यांकडून आणखी काही मोटार सायकल जप्त होण्याची शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पो.ना. उमेश पाटील, पो.ना. समाधान पाटील तसेच गोपनीयचे विनोद संदानशिव, वैभव बाविस्कर हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चौकशी अद्याप सुरु असून संशयित आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची नावं पोलिसांनी उघड केलेली नाहीत.