कासगंज (वृत्तसंस्था) अपहरण केल्यानंतर तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये घडली आहे. संतापजनक म्हणजे घटनेच्या तीन दिवसांनी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, सुन्नगढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ११ फेब्रुवारी रोजी दुपारी तिघे आरोपी पीडितेला फूस लावून घेऊन गेले. त्यानंतर एका खोलीत तिला डांबून ठेवले आणि तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तीन दिवसांनी तिला गावाजवळ सोडून ते फरार झाले. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.